ठाणे जिल्ह्याचा आकार मोठा असल्याने नव्या जिल्ह्याची मागणी होऊ लागली. याची दखल घेत २०१४ साली पालघर स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला. जिल्हा निर्मितीच्या अकरा वर्षांनंतरही पालघरमध्ये अनेक समस्या आहेत. तर उद्याोगधंद्यांच्या बाबतीत ठाणे प्रगतिपथावर असला तरी ग्रामीण भागात अद्याप सुविधांची वानवा आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘जिल्हा निर्देशांक’ मालिकेत या दोन्ही जिल्ह्यांच्या प्रगतीचा वेध.




