Methodology

महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ‘डीडीआय’ अर्थात ‘जिल्हा विकास निर्देशांक’ तयार करण्यासाठी, विकासासंबंधी सर्वंकष दृष्टिकोन स्वीकारला जाईल. विकास ही एक बहुआयामी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मानवी जीवनाच्या विविध पैलूंना प्रभावित करणारे परिवर्तन समाविष्ट आहे, हे अर्थशास्त्रज्ञांनी फार पूर्वीच मान्य केले आहे. त्यामुळे, हा निर्देशांक आर्थिक कामगिरी, सामाजिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास तसेच कायदा व सुव्यवस्था यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींच्या आधारे जिल्ह्यांच्या कामगिरीचा वेध घेईल. प्रत्येक परिमाणांवरील उपलब्धी ही विविध निर्देशकांद्वारे दर्शविली जाईल. या संदर्भात केंद्र किंवा राज्य सरकारांनी ठरवून दिलेल्या विविध उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या दिशेने जिल्ह्याची प्रगती देखील विचारात घेतली जाईल. अधिकृत स्त्रोतांद्वारे उपलब्ध झालेल्या सर्वात अद्ययावत माहितीवर हा निर्देशांक आधारित असेल.

जिल्हा-स्तरीय निर्देशांक गुणांक हा तुलना करण्यासाठी वापरात आणला जाईल. तुलना करताना महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांमधील उपजत भौगोलिक आणि लोकसंख्याशास्त्रीय विविधता, जसे की दुष्काळी किंवा किनारपट्टीचा प्रदेश, वनपट्टा, आदिवासी प्रदेश या घटकांना विचार घेतले जाईल. या उपक्रमामुळे सरकारी अधिकाऱ्यांना जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नियोजनात्मक प्रयासांची प्रभावीपणे आखणी करण्यास निश्चितच मदत होईल.