Expert Quotes


Ajit Ranade
उपलब्ध आणि खातरजमा केलेल्या माहितीच्या आधारे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचा वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय पद्धतीने विकास व्हावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. संघराज्य सहकार्याचे तत्त्व लोकशाहीच्या तिसºया स्तरापर्यंत नेण्याची कल्पना आहे. आम्ही विकसित केलेल्या ‘निर्देशांका’मुळे असंतुलन शोधता येईल आणि अधिक संसाधने पुरवून ही दरी कमी करता येईल. सार्वजनिक साधने, खासगी पाठबळ आणि स्थानिक उपयुक्त गोष्टींच्या आधारे संतुलित विकासाचे ध्येय गाठता येईल. राज्यांतर्गत केंद्रीभूत सहकार्याच्या दिशेने याची वाटचाल होईल. आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७१ (२)मध्ये स्थानिक असंतुलन दूर करण्यासाठी महाराष्ट्राला विशेष दर्जा देण्यात आला आहे.
– अजित रानडे, कुलगुरू, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स
Sitaram Kunte
आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या वेगवेगळ्या मानकांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांचे श्रेणी निर्धारण करण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. प्रत्येक जिल्ह्याला आपली बलस्थाने आणि उणिवा यांची वस्तुनिष्ठ माहिती यातून मिळेल. त्या आधारे शासन आणि जिल्हा नियोजन मंडळांना विकासाचे सकारात्मक प्रयत्न करता येतील.
– सीताराम कुंटे, माजी मुख्य सचिव


Shirish Sankhe
जिल्ह्यांच्या मानांकनाची प्रक्रिया माहिती आणि तथ्यांवर आधारित असावी. योग्य पद्धतीने प्रक्रिया राबवल्यास विधायक गोष्टी सर्वांसमोर येतील आणि सर्व जिल्ह्यांना एकमेकांकडून काहीतरी शिकता येईल. चांगल्या कामांच्या माहितीचे हे सुयोग्य संकलन असेल.
– शिरीष संख्ये, सिनिअर पार्टनर, ‘मॅकेन्झी’
Niranjan Rajadhyaksha
राज्याच्या विविध भागांमध्ये अनेक प्रकारच्या विकासकामांचा अनुभव गाठीशी असलेले महाराष्ट्र हे एक मोठे राज्य आहे. आकडेवारीचा उपयोग करून कामगिरीनुसार जिल्ह्यांची क्रमवारी लावण्याची कल्पना सरकार आणि नागरिक अशा दोघांसाठीही खूप मोलाची ठरेल. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचे मी स्वागत करतो.
– निरंजन राजाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अर्थ इंडिया रिसर्च अॅडव्हायझर्स

